माती परिक्षण (प्रयोगशाळा आणि विश्लेषणात्मक सेवा)

माती परिक्षणामध्ये तपासले जाणारे घटक:

भौतीक घटक

रासायनिक घटक

अन्नद्रव्ये

पाणी धारक क्षमता

सामू

नत्र

मॅग्नेशियम

झिंक(जस्त)

मातीची पोत

विद्दुतधारकता(क्षारता)

स्फुरद

गंधक

लोह

पोत प्रकार

चुनखडी

पालाश

सोडीयम

मॅगनीज

सच्छिद्रता

सेंद्रीयकर्ब

कॅल्शीयम

तांबे

बोरॉन

 

 

मॉलिब्डेनम

   

परिक्षणासाठी मातीचा नमुना घेणे

मातीच्या प्रातिनिधिक नमुना घेतांना घ्यावयाची काळजी:

  • शेतावरील जनावरे बसण्याची जागा, खत साठवण्याची व कचरा टाकण्याची जागा, झाडाखालील जमिनीचे नमुने घेऊ नयेत.
  • मातीचा नमुना साधारणपणे पिकाची कापणी झाल्यावर परंतु नांगरणीपूर्वी घ्यावा.
  • तसेच पिक लागवडीच्या २ महिन्यापूर्वी मातीचे नमुने घ्यावे.
  • शेतात पिक उभे असल्यास २ ओळीतील जागेतून मातीचा नमुना घ्यावा.
  • पिकांना रासायनुक खते दिली असल्यास दोन किंवा अडीच महीन्याच्या आत मातीचे नमुने घेऊ नयेत.
  • निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीचे किंवा निरनिराळ्या शेतातील मातीचे नमुने एकत्रीत मिसळू नयेत.
  • रासायनिक खतांच्या रिकाम्या केलेल्या पिशव्या मातीचा नमुना घेण्यासाठी वापरु नयेत.
  • हलकी जमिन असेल तर प्रत्येक वर्षी माती परिक्षण करणे जरुरी आहे. साधारणतः किमान वर्षातून एकदा माती परिक्षण करणे गरजेचे आहे.
  • तृणवर्गीय व कडधान्य पिकांसाठी १०० सें.मी. व ऊस, कापूस व केळी पिकांसाठी ३० सें.मी. खोलीपर्यंत नमुना घ्यावा.

मातीचा प्रातिनिधिक नमुना घेण्याची पध्दत :

  • जमिनीचा रंग, उंचसखलपणा, खोली, पोत, खडकाळ, पाणथळपणा, पाण्याच्या निचर्‍याची परिस्थिती, तसेच क्षारयुक्त किंवा चोपण जागा इत्यादी सर्व बाबींचा विचार करुन शेताचे निरनिराळे भाग पाडावेत आणि प्रत्येक विभागातून स्वतंत्रपणे प्रातिनिधिक नमुना घ्यावा. नमुने घेताना साधारणतः प्रत्येक विभागातून २०० ते ३०० ग्रॅमपर्यंत माती घ्यावी
  • विभागातील प्रत्येक भागातून सुमारे १० ते १५ ठिकाणांतून १०० ते २०० ग्रॅम वजनाचे मातीचे नमुने घ्यावेत. त्यापासून मिसळून एक प्रातिनिधिक नमुना तयार करावा. मातीचा नमुना घेताना अगर, खुरपे, फावडे, गिरमीट, पहार, कुदळे, घमेले, बादली, कापडी पिशवी, पोतं व लेबल यांचा वापर करावा. परंतू जर सुक्ष्म अन्नद्रव्ये तपासणी करायची असेल तर लोखंडी साहित्याचा वापर करु नये. कारण लोखंडाचे प्रमाण त्यामध्ये मिसळण्याची शक्यता असते आणि म्हणूनच आपण केलेल्या सुक्ष्म अन्नद्रव्यांचे निरीक्षण हे चुकीचे ठरु शकते. मातीचे नमुने घेताना सरळ रेषेत न घेता नागमोडी रेषेतच घ्यावेत. याची मात्र दक्षता घ्यावी.
  • शेतामधील मातीचा नमुना घेताना प्रथम पृष्ठभागावरील काडीकचरा बाजूला सारुन एका शेतातील सुमारे (एकरी १२-१५ ठिकाणाहून) सुमारे १० ते १५ ठिकाणाहून तृणधान्य व कडधान्ये पिकांकरिता १५ ते २० सें. मी. खोलीपर्यंतचा मातीचा थर गोळा करावा. खुरपे किंवा फावडे यांचा उपयोग करावयाचा असेल तर इंग्रजी व्ही आकाराचा १५ ते २० सें.मी. खोलीचा खड्डा करावा. या खड्यातील एका बाजुची सारख्या जाडीची माती (-सें.मी.) आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे वरपासून खालपर्यंत खुरपे किंवा फावड्याच्या साहाय्याने घ्यावी.
  • प्रत्येक विभागातून सुमारे १० ते १५ ठिकाणाचे मातीचे नमुने गोळा करुन स्वच्छ पोत्यात किंवा घमेल्यात जमा करावेत व त्यानंतर त्यामधील काडीकचरा, बारीक दगड, मुळांचे अवशेष इत्यादी काढून टाकावे व ती माती चांगली एकत्र मिसळवावी.
  • नंतर त्या मातीचे चार समान भाग करुन समोरासमोरील दोन भाग ठेवून बाकीची माती बाहेर टाकावी. नंतर राहिलेल्या दोन भागांची माती पुन्हा चांगली एकत्र करुन चार समान भाग पाडावेत. असे शेवटी अंदाजे अर्धा किलो मातीचा नमुना मिळेपर्यंत ही कृती करत रहावी व नंतर ती माती प्रातीनिधिक नमुना म्हणून एक स्वच्छ कापडी पिशवीत भरावी.
  • फळबागायती जमिनीचा नमुना घ्यावयाचा असेल तर त्याकरीता १x१x१ मीटरचा खड्डा खोदुन खड्ड्याच्या एका बाजूने ३० सें.मी. पर्यंत एक, ३०-६० सें.मी. पर्यंत दुसरा, ६०-९० सें.मी. पर्यंत तिसरा व ९०-१०० सें.मी. पर्यंत चार असे वेगवेगळे (एकुण ) नमुने घ्यावे.

द्राक्षबागेतील नमुना कसा घ्यावा?

द्राक्ष बागेतील माती परिक्षण:

द्राक्षबागेतील अन्नद्रव्यांचे प्रमाण काढण्यासाठी बोदावर जेथे ड्रिपमधुन पाणी पडते, त्यापासुन बाजूला ३० सें.मी. अंतरावरील नमुना गोळा करावा. द्राक्ष बागेच्या क्षेत्रानुसार १ ते ५ एकर क्षेत्रासाठी एक नमुना घ्यावा आणि त्या प्रमाणत क्षेत्र वाढल्यास नमुन्यांची संख्या वाढवावी. एका क्षेत्रामधुन १५ ते २० ठिकाणांहुन नमुने गोळा करुन त्यापासुन एकच अर्धा ते १ किलो प्रतिनिधिक नमुना प्रयोग शाळेत पृथःकरणासाठी पाठवावा.

माती नमुना काढण्याची पध्दत:

माती नमुना घेताना सुरवातीला पृष्ठभागावर असणारा काडीकचर्‍याचा थर बाजुला करावा. त्यानंतर इंग्रजी व्ही आकाराचा ३० सें.मी. खोलाचा खड्डा घ्यावा. आकृतीत दाखवल्या प्रमाणे १-२ सें.मी. जाडीचा दोन्ही बाजुचा थर खुरप्याने खरवडुन काढावा. माती नमुन १५-२० ठिकाणांहुन गोळा करुन अर्धा ते १ किलो नमुना प्रयोग शाळेत पाठवावा.

नमुना काढण्यासाठी वापरावयाची साधने:

माती नमुना काढण्यासाठी योग्य साधने असने फारच महत्वाचे आहे. त्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले अगर, टिकाव, फावडे, खुरपी वापरावीत. महाराष्ट्रामध्ये सध्या स्क्रु अगर आणि पोस्ट होल अगर नेहमी वापरतात.

नविन द्राक्षबाग लागवण्यासाठी माती परिक्षण:

जमिनीच्या प्रकारानुसार उदा. मध्यम, हलकी किंवा चढ-उताराची किंवा जास्त चुनखडीयुक्त, कमी चुनखडीयुक्त इ. जमिनीचे भाग करावेत. जमिनीचे क्षेत्र साधारणतः १ ते ५ एकरापर्यंत असेल तर एक नमुना घ्यावा आणि त्या प्रमाणात क्षेत्र वाढल्यास नमुन्यांची संख्याही वाढवावी. प्रातिनिधिक नमुना गोळा करण्यासाठी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे १५-२० ठिकाणांहुन नमुने गोळा करावेत. सर्व नमुने एकत्र करुन आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एकच नमुना करुन त्याचे चार भाग करावेत. समोरासमोरील भाग काढुन टाकुन उरलेली माती एकत्र करावी. अशा प्राकारची क्रिया दोन ते तीन वेळा करुन त्यापासुन एकच अर्धा ते १ किलोचा नमुना प्रयोगशाळेत पृथःकरणासाठी पाठवावा.

मातीच्या नमुन्यासोबत पाठवावयाचे माहितीपत्रक

  • शेतकर्‍यांचे नाव व पुर्ण पत्ता
  • सर्व्हे नं./गट नं.
  • शेताचे नाव
  • (हेक्टर)
  • जमिनीचा प्रकार(हलकी/मध्यम/भारी)
  • जमिनीचा रंग(लाल/पिवळसर/काळा)
  • जमिनीचा उतार(उथळ/मध्यम खोल/खोल)
  • जमिनीचा प्रकार(कोरड्वाहु/बागायत)
  • ओलिताचे साधन असल्यास(विहीरी/कॅनॉल/तळी)
  • जमिनीची समस्या- खारवट/चोपण/आम्ल/चुनखडी/ओसाड/खडकाळ
  • मागील हंगामात घेतलेले पीक, त्यांचे उत्पादन, वापरलेली खते व त्यांचे प्रमाण
  • पुढील हंगामात घ्यावयाची पीके, त्यांचे वाण व अपेक्षीत उत्पादन
  • माती परिक्षण कशासाठी- प्रमुख अन्नद्रव्ये/दुय्यम अन्नद्रव्य्र/सुक्ष्म अन्नद्रव्ये/सामू/ विद्दुत वाहकता/ घनता/पाणी धरुन ठेवण्याची क्षमता
  • नमुना घेतल्याची तारीख