प्रयोगशाळा तपासणी करार (प्रयोगशाळा आणि विश्लेषणात्मक सेवा)

आमच्या अत्याधुनिक प्रयोगशाळेच्या सेवा करार पध्दतीने खाली दिलेल्या संस्थांसाठी उपलब्ध आहेत.

  • खते उत्पादन कंपन्या व वितरक.
  • पिक वाढ व संजीवके उत्पादक व वितरण.
  • खते व पिक वाढ व संजीवके यांचे आयातक.
  • खते व पिक वाढ व संजीवके यांचे संशोधक / विकसक
  • बियाणे उत्पादक व वितरक.
  • करार शेती करणा-या कंपन्या, शेतक-यांकडून स्थापीत व चालवल्या जाणा-या कंपन्या, शेतक-याचे गट, वाईन कंपन्या इत्यादी.

करार पध्दतीमध्ये खास कमी केलेल्या दरामध्ये प्रयोगशाळा सेवा पुरवल्या जातात.

या सुविधेचा उपयोग खालील कामांसाठी केला जाऊ शकतो.

  • उत्पादीत / आयात केलेल्या खतांचा दर्जा तपासणे.
  • घाऊक पध्दतीने खरेदी करण्यात येणा-या खतांचा दर्जा तपासणे ( शेतकरी किंवा शेतकरी कंपन्या / गटांसाटी )
  • करार शेती करणा-या कंपन्या / वाईनरी यांच्या सदस्य शेतक-यांसाठी माती, पाणी, पानदेठ, सुक्ष्मजीव इ. तपासण्या

अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा