सोनकुळ अॅग्रो ग्रुप उच्च प्रतीची सेंद्रीय उत्पादने व दर्जेदार सेवा शेतकर्यांच्या हीतासाठी मागील २५ वर्षापासुन पुरवत आलेले आहे. या प्रवासामध्ये हजारो शेतकर्यांशी साधलेला संवाद व त्यांचे अनुभव यांचा विचार करुन आम्ही शेतकर्यांसाठी हॉर्टीकल्चर गाईडन्स सेल ही सेवा सादर पुरवत आहोत.
शेतीमध्ये वापरल्या जाणार्या तंत्रज्ञानामध्ये वेगाने बदल होत आहेत व दिवसेंदिवस आधुनिकीकरणाकडे भारतीय शेतीची वाटचाल होत आहे. जलद गतीने बदलणार्या या तंत्रज्ञानाची माहिती वेळेवर शेतकर्यांपर्यंत पोचावी तसेच अन्नद्रव्ये व किड रोग व्यवस्थापण प्रभावीपणे करता यावे हा या सेवेमागचा उद्देश आहे.
शेती करताना येणार्या विविध अडचणी सोडवण्यासाठी शास्त्रीय सल्ला आवश्यक असतो. कृषी क्षेत्राचा अनुभव असणार्या शास्त्रज्ञांच्या ज्ञानाचा लाभ शेतकर्यांपर्यंत पोचावा यासाठी हॉर्टीकल्चर गाईडन्स सेल मार्फत माफक दरामध्ये सल्ला व मार्गदर्शन केले जाते.
पिकांची निवड, लागवड करताना घ्यावयाची काळजी एकात्मीक अन्नद्रव्य, किड, रोग तसेच तण व्यवस्थापन, गुणवत्ता व उत्पादन वाढ, सेंद्रीय शेती यासारख्या विषयांवर या सेलद्वारे मार्गदर्शन केले जाते.
अधिक माहीतीसाठी शेतकरी खाली दिलेल्या क्रमांकावर किंवा ईमेल वर संपर्क साधु शकतात.
9822304864 info@bioorganic.co.in