जागतीक आरोग्य संघटनेनुसार विविध प्रकारच्या रोगांचा प्रसार होण्यासाठी पाणी हे एक महत्वाचे माध्यम आहे. पिण्यासाठी किंवा वापरण्यासाठीचे पाणी विविध प्रकारच्या रोगकारक जीवाणू, बुरशी तसेच विषाणूंचा प्रसार होण्यासाठी कारणीभूत ठरु शकते.
पिण्याच्या / वापरण्याच्या पाण्याची वेळोवेळी योग्य पध्दतीने तपासणी केली जाणे गरजेचे असून यामुळे विविध प्रकारच्या सुक्ष्म जीवांमुळे होण्याच्या आजारांचा प्रसार रोखता येतो.
साथीचे आजार रोखण्यासाठी सुध्दा पेयजल तपासणी आवश्यक असते.
आमच्या प्रयोगशाळेमध्ये पिण्याच्या पाण्याच्या रासायनीक तसेच जैविक तपासण्या केल्या जातात. त्याच बरोबर अन्नप्रकीया / दूध उद्योगांमध्ये वापरले जाणारे पाणी सुध्दा तपासले जाते.