द्राक्ष पिकामध्ये केल्या जाणा-या माती, पाणी तसेच पानदेठ परिक्षणासोबत द्राक्षकाडी परिक्षण ही एक महत्वाची पायरी समजली जाते.
येणा-या हंगामामध्ये वेलीवर येणा-या घडांची; परिणामी उत्पादनाची प्रक्रीया द्राक्षवेल सुप्तावस्थेत असतानाच सुरु झालेली असते.
ऑक्टोबर किंवा गोडी छाटणी करण्यापूर्वी द्राक्षकाडी परिक्षण केले जाते. वेली मध्ये असलेल्या अन्नसाठयाच्या प्रमाणावरुन द्राक्षकाडीवरील डोळ्यांची वाढ होत असते.
प्रयोगशाळेमध्ये सुक्ष्मदर्शकाचा वापर करुन काडीवरील डोळ्यांचे परिक्षण केले जाते व त्यावरुन संबंधीत डोळ्यामध्ये नवीन निरोगी घड निर्मीतीची क्षमता आहे किंवा नाही यांची माहीती मिळते.
या माहीतीचा उपयोग करुन बागायतदाराला ऑक्टोबर छाटणीचे नियोजन करता येते. परिणामी द्राक्षवेलीमधील अन्नसाठयाचा पुरेपूर उपयोग करुन उपलब्ध परिस्थीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यास मदत होते.