सूत्रकृमी हे पिकांचे नुकसान करणारे अतिसूक्ष्म धाग्यासारखे लांबट जंतू असून त्यांची सरासरी लांबी ०.२ ते ०.५ मिमी इतकी असते त्यामुळे ते डोळ्यांनी दिसत नाहीत. सूत्रकृमींना जगण्यासाठी प्रामुख्याने ओलावा व पिकांची जरूरी असते. जमिनीतील मातीच्या कणांच्या पोकळीत त्यांचे वास्तव्य असून ते जमिनीतून अथवा झाडांच्या अंतर्गत भागात राहून नुकसान करतात.
निरनिराळ्या पिकांवर सुमारे ७५ प्रकारच्या सूत्रकृमींचा प्रादूर्भाव होत असल्याचे आढळून आले असून त्यांचे नियंत्रण रासायनिक सूत्रकृमीनाशके वापरून करणे अतिशय खर्चाचे व अवघड असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना फायद्याची ठरते.
आमच्या प्रयोगशाळेत माती तसेच मुळांवर वास्तव्य करणा-या हानीकारक सूत्रकृमींची तपासणी केली जाते. सूत्रकृमींची संख्या धोकादायक पातळीच्या वर असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी उपायोजना तज्ञांच्या मदतीने सुचविल्या जातात.
आमच्या प्रयोगशाळेमार्फत उपलब्ध असलेली सुक्ष्मजीव तपासणी सुविधा शेतक-यांसाठी उपयोगी ठरत आली आहे. वनस्पतींची मुळे, इतर भाग तसेच मातीमधील रोगकारक सुक्ष्मजीवांची ओळख व त्यांच्या व्यवस्थापनासाठीच्या उपाययोजना यासाठी ही सुविधा आवश्यक आहे. त्याच बरोबर मातीमधील सुक्ष्म जीवांची तपासणी करुन रोगाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी अगोदरच उपाययोजना ठरवता येते.
माती, पाणी, तसेच पिकांची मुळे व इतर भागांची तपासणी करता येते.